*कोकण Express*
*लोरे ग्रा. प. मार्फत वॉटर एटीएम*
*सरपंच अजय रावराणे यांचा स्तुत्य उपक्रम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायत लोरे चे विकासाच्या दृष्टीने आणखीन एक पुढच पाऊल टाकले आहे . प्रथमच शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वॉटर एटीएम RO प्लंट बसविण्यात आला असून १ रुपयात १ लिटर पाणी व ५ रुपयात १० लिटर पाणी तसेच १० रुपयात २० लिटर पाणी दिले जाणार आहे . सदर वॉटर ATM चे काम १५ व्या वित्त आयोगा मधून करण्यात आले. लोकार्पण सोहळा माजी सभापती मनोज तुळशीदास रावराणे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी संरपंच अजय तुळशिदास रावराणे , उपसरपंच रोहिणी रघुनाथ रावराणे , ग्रामसेवक ऋतुराज महादेव कदम , ग्रा . पं . सदरय अनंत राणे , नरेश गुरव तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . सदर वॉटर ATM चा फायदा पंचक्रोशीतील गवांना होणार आहे . तसेच लघु उद्योग आणि कोकम सरबत करणाऱ्या व्यवसाय धारकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याने त्याचा लाभ घ्यावा , असे आवाहन सभापती मनोज तुळशिदास रावराणे यांनी केले व सरपंच अजय रावराणे यांनी सर्वाचे आभार मानले .