केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांना पोहचवीण्यात जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पद

केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांना पोहचवीण्यात जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पद

*कोकण Express*

*केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांना पोहचवीण्यात जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पद*

*प्रमोद सावंत, गोवा मुख्यमंत्री*

*सिंधुनगरी प्रतिनिधी*

केंद्राच्या योजना राबवत सर्वसामान्यांना तसेच शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक करीत असलेले काम खरोखरच कौतुकाला पात्र आहे अशा शब्दात गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जिल्हा बँक बद्दल गौरवोद्गार काढले
मालवण येथे कोकणी साहित्य संमेलनाला आलेले गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सदिच्छा भेट दिली यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी शाल श्रीफळ व गोमे चा गणपती देऊन त्यांचा सत्कार केला जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी नुकतीच आपली गोवा येथे भेट घेतली होती यावेळी त्यांनी आमच्या जिल्हा बँकेला भेट देण्याची विनंती केली त्यानुसार मी आज येथे आले जिल्हा बँकेचा अहवाल बघितल्यावर मला नुसते समाधान नव्हे तर आश्चर्य वाटले कारण या बँकेने एनपीए झिरो वर ठेवला आहे खरोखरच ही गोष्ट कौतुकास्पद आहे आतापर्यंतच्या सर्व संचालक मंडळाने बँकेचे काम मनापासून केल्याने हे शक्य झाले सहकारात काम करताना स्वाहाकार बाजूला ठेवून सहकार्याने काम करणं हे महत्त्वाचं आहे आणि तसं हे या बँकेने करून दाखवल्याने खरोखरच कौतुक आहे या बँकेने छोट्याशा उद्योजकाला शेतकऱ्यांना महत्त्व देत व्यवसायिक बनवले केंद्र शासनाच्या योजना राबवून आत्मनिर्भर बनवण्याचे काम आणि कौतुकास पात्र आहे वास्तविक राज्य शासनाने हा प्रयत्न केला पाहिजे होता मात्र जिल्हा बँक कोणते हे बघून आनंद वाटला या बँकेने नॅशनल बँकेच्या बरोबरीने चांगला व्यवसाय केल्याचे दाखवून दिले शेती कृषी मध्ये काम करून शेतकऱ्याला मदत करत आहेत असेच उल्लेखनीय कार्य याही पुढे त्यांच्या हातून घडत जावं अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या संचालकांबरोबरच कर्मचारी वर्गाचे ही त्यांनी कौतुक केले कर्मचारी वर्ग महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले या बँकेच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे बँक पुढे घ्यायची असेल तर कर्मचाऱ्यांचे काम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितलं आम्ही कर्मचार्‍यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्ह्याची आर्थिक उलाढाल डोळ्यावर अवलंबून आहे या जिल्ह्यातील तालुके गोव्या जवळ आहेत गोव्याच्या आणि आमचे जवळचे नाते आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक व्यवसाय उभे राहत आहेत फुड प्रोसेस साठी आमचा प्रयत्न आहे मार्केटच्या दृष्टीने आम्ही गोव्याकडे बघतो आता जिल्ह्यातील शेतकरी एक ते दीड हजार दुधाळ जनावरे घेत आहेत दूध व्यवसायाला आम्ही चालना देत असून हे दूध गोव्यामध्ये विचलित करण्याचा आमचा मानस असून त्यासाठी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले प्रारंभी जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक अनिरुद्ध देसाई यांनी बँकेच्या कामकाजाची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दिली
यावेळी संचालक विठ्ठल देसाई प्रकाश मोर्ये रवींद्र मडगावकर आत्माराम ओटवणेकर प्रभाकर सावंत , समिर सावंत प्रज्ञा ढवण निता राणे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!