*कोकण Express*
*केर गावात हत्तींच्या कळपाचा धुमाकुळ*
*आम.दिपक केसरकर यांनी मोर्ले गावात भेट देऊन नुकसानीची केली पाहणी *
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
गेल्या चार पाच दिवसापासून केर गावा त धुमाकुळ घालून शेतकरी बांधवांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या लाखो रूपये नुकसान करणारा हा कळप गुरुवारी राञी उशिरा बाजुला असलेल्या मोर्ले गावात दाखल होऊन येथील पाच ते सहा शेतकरी यांचे माड बांबू केळी सुपारी झाडे यांचे मिळून लाखोंचे नुकसान केले तर या कळपातील हत्ती मोठ मोठ्याने ओरडत फणस खाण्यासाठी रूपावती गवस हिच्या अंगणात दाखल झाला.समोर हत्ती पाहुन महिलेचा थरकाप उडाला पोटात भितिचा गोळा उठला तिने आरडा ओरडा केला नंतर गावातील ग्रामस्थ यांनी हत्तींना हाकलून लावले.शुक्रवारी दुपारी आम.दिपक केसरकर यांनी मोर्ले गावात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.