*कोकण Express*
*मालवणात आजपासून पर्यटन महोत्सवाचा जल्लोष*
*आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार उद्घाटन*
*विविध कार्यक्रमांची मेजवानी*
*सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत करणार बहारदार गाण्यांचे सादरीकरण*
मालवण नगरपरिषद व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर मालवण दांडी बीच येथे “जल्लोष २०२२” पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.आज शुक्रवार १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे महोत्सवात इंडीयन आयडॉल फेम, सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांची खास उपस्थिती असून बहारदार गाण्यांचे सादरीकरण ते करणार आहेत.
*१३ रोजी होणारे कार्यक्रम..*
१३ मे रोजी नौका सजावट स्पर्धा, वाळू शिल्प कलाकृती, सायकल रॅली होणार आहे. तर सायंकाळी ४ ते ५ वाजता मालवणी खाद्य पदार्थ पाककला स्पर्धा, सायंकाळी ६ ते १० ‘आमदार वैभव नाईक श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा, गायन स्पर्धा, स्थानिक दशावतार (महिला व पुरुष) असे कार्यक्रम होणार आहेत. तर इंडीयन आयडॉल फेम रोहित राऊत हे बहारदार गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत.
*१४ रोजी मालवण सुंदरी व अन्य कार्यक्रम..*
१४ मे रोजी सायंकाळी ४ ते ६ खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे तर सायंकाळी ७ ते १० मालवण सुंदरी स्पर्धा आणि नृत्य सादरीकरण होणार आहे.
*१५ रोजी समारोप सोहळा*
१५ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ लोककलाकार कार्यक्रम, सायंकाळी ६ ते ७ बक्षीस आणि सांगता समारंभ तर सायंकाळी ७ ते १० यावेळेत “जल्लोष” हा सिनेकलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या महोत्सवाला पर्यटक व जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहून आंनद लुटावा, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.