*कोकण Express*
*वागदे सरपंच पूजा घाडीगावकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर…*
भाजप पक्षात प्रवेश केलेल्या वागदे ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा घाडीगावकर यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. या ठरावा करिता पीठासन अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार शिवाजी राठोड यांनी काम पाहिले.
आज वागदे ग्रामपंचायत मध्ये या अविश्वास ठरावाच्या संदर्भात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सरपंच पूजा घाडीगावकर या अनुपस्थित राहिल्या. तर ग्रामपंचायतचे ८ सदस्य या बैठकीला हजर होते. ० विरुद्ध ८ अशा बहुमताने आजच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. आता हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार शिवाजी राठोड यांनी दिली.