*कोकण Express*
*कणकवली शहरातील पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील पाणी पुरवठा ४ आणि ५ डिसेंबर या कालावधीत बंद राहणार आहे. शहरातील नळयोजनेच्या टाक्यांना पाणी पुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड झाला असून, या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम उद्या (ता.३) केले जाणार आहे. त्यामुळे कणकवली शहरातील सार्वजनिक नळयोजनेचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. याबाबतची नोंद शहरातील नळकनेक्शन धारकांनी घ्यावी असे आवाहन कणकवली मुख्याधिकार्यांनी केले आहे.