ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची निवड

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची निवड

*कोकण Express*

*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची निवड*

*कासार्डे:संजय भोसले*

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.त्यांनी अल्पावधीत संघटनेच्या माध्यमातून केलेल्या उत्तम कार्याची दखल घेऊन त्यांना कोकण विभागीय अध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे.राष्ट्रीय कार्यकारणीने ही निवड जाहीर केली आहे.

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदावरती निवड झाल्यावरती संतोष नाईक यांनी सिंधुदुर्गात प्रत्येक तालुक्यात उत्तम संघटना बांधणी केली आहे.तसेच सर्व तालुक्यातील संघटनांना कार्यरत ठेवण्यासाठी नेहमीच संपर्क असतो.जिल्ह्यातील अनेक ज्वलंत सामाजिक विषयांवर शासनाचे लक्ष वेधून घेतले.तसेच विकासाच्या मूलभूत समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. कोरोना महामारीच्या काळात तर जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी आरोग्य यंत्रणेशी नियमितपणे संपर्कात राहून अनेक त्रुटी समोर आणल्या आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला.त्यामुळे खऱ्या अर्थाने रुग्णांना दिलासा मिळाला.

संतोष नाईक यांची समाजसेवेची सुरुवात कॉलेज जीवनापासून झाली.त्यानंतर नोकरीनिमित्त मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून काम पाहिले.त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन (M.S.M.R.A.) युनिट रत्नागिरी या संघटनेमध्ये बारा वर्षे कार्यरत होते.

त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना जिल्हाध्यक्षपदी निवड झाली.सलग दहा वर्षे संघटनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून रिक्षाचालकांना न्याय हक्क मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.संतोष नाईक यांना सामाजिक क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे.

त्यानंतर ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून दीड वर्ष काम करण्याची संधी मिळाली.याठिकाणी सिंधुदुर्ग युनिटच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांना सोबत घेऊन काम करत असतांना बेस्ट परफॉर्मन्स अॅवार्ड मिळाले. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उत्तम काम केल्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीने व राज्य कार्यकारणीने कोकण विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती केली.मानवाच्या मूलभूत अधिकारांचे जतन होण्यासाठी त्यांनी निःस्वार्थी वृत्तीने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची निवड झाल्याने संपूर्ण कोकणात ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ही मानवाचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारी संघटना अधिक जोमाने कार्य करेल.
त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!