*कोकण Express*
*फोंडाघाट ग्रामपंचायत कार्यालय येथे उद्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची e-kyc कॅम्पचे आयोजन*
*फोंडाघाट ःःप्रतिनिधी*
दिनांक 11/05/2022 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय फोंडाघाट येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची E-KYC चा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.तरी सदर कॅम्प मध्ये उपस्थित राहून E-KYC पूर्ण करून घेणे. तसेच E-KYC धारकांनी स्वतः उपस्थित राहून आधारकार्ड व स्वतःचा मोबाईल सोबत घेऊन येणे असे आव्हान फोंडाघाट ग्रामपंचायतीचे ग्राम विस्तारक चंद्रकांत चौहुल्कर व सरपंच संतोष आग्रे यांनी केले आहे.