*कोकण Express*
*कणकवलीत आज पासून कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन!*
*सिंधुरत्न कलावंत मंच व कणकवली नगरपंचायतच्या संयुक्त विद्यमाने मोफत चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुरत्न कलावंत मंच व कणकवली नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन कणकवलीत करण्यात आले आहे. कणकवली नगर वाचनालयाच्या हॉलमध्ये हा महोत्सव होणार आहे. कोकण चित्रपट महोत्सवात निवडलेले 13 चित्रपट या महोत्सवाच्या निमित्ताने कणकवलीकरांना चार दिवसात अगदी मोफत पाहता येणार आहेत. 10 ते 13 मे पर्यंत हा महोत्सव होणार आहे. दिवसभरात तीन चित्रपट मोफत पाहण्याची सुवर्णसंधी कणकवलीकराना असणार आहे. त्यामध्ये पहिला चित्रपट सकाळी 11 वाजता, दुसरा चित्रपट दुपारी 2 वाजता, तिसरा चित्रपट संध्याकाळी 5 वाजता पाहता येणार आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे