*कोकण Express*
*कणकवली – कुंभवडे धरणाचे काम बंद पाडले*
*जमीन, झाडांच्या मोबदल्याची रक्कम जाहीर करा*
*प्रकल्पग्रस्तांची मागणी: तोपर्यंत काम करू न देण्याचा इशारा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील कुंभवडे येथील धरणाचे चालू असलेले काम प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी आज सोमवारी बंद पाडले. सकाळी दहा वाजल्यापासून प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ धरणाच्या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चालू असलेली मशीनरी व वाहतूक करणारे डंपर एका ठिकाणी उभे करण्यास सांगितले. व जमलेल्या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी तिथेच ठिय्या मांडून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन केले. आंदोलन चालू असताना संबंधीत खात्याचा अधिकारी यांनी याची दाखल घेतली नाही. कोणी अधिकारी न फिरकल्याने प्रकल्पग्रस्थानी उपजिल्हाधिकारी भू संपादन यांच्या नावे निवेदन तयार करून त्यावर प्रकल्पग्रस्थाच्या सह्या व ठेकेदार च्या दोन प्रतिनिधी सह्या घेण्यात आल्या आहेत. व त्यांच्या सहमतीने काम बंद केल्याचे त्यांनी सांगितले. जमीन व झाडें यांचा मोबदला मिळालेला नाही, तसेच जमीन व झाडांची किती किंमत मिळणार हे सुद्धा सांगितलेले नाही. तरी भूसंपादन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तां सोबत बैठक घेऊन जमिनीची व झाडांची मिळणारा मोबदला जाहीर करावा अशी मागणी केली आहे.