*कोकण Express*
*कमी करा, कमी करा, महागाई कमी करा…!*
*भारतीय मजदूर संघाचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्यात प्रचंड वाढलेली महागाई कमी करण्यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत धरणे आंदोलन छेडले . कमी करा , कमी करा , महागाई कमी करा ‘ , ‘ पेट्रोल डिझेल किमती जीएसटी कक्षेत आणा ‘ ‘ भारत माता की जय ‘ , ‘ वंदे मातरम् ‘ ‘ भारतीय मजदूर संघाचा विजय असो , अशी घोषणाबाजी सदस्यांनी परिसर दणाणून सोडला त्यानंतर संघाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेऊन राज्य सरकारने महागाईवर विविध उपाययोजना करून त्वरित नियंत्रण आणावे याप्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदनही सादर केले . प्रचंड वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे . राज्यात गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींनी आभाळ गाठले आहे . पेट्रोल १२१ रुपये , डिझेल ११० रुपये , सीएनजी ७४ रुपये , सिलिंडर १००० रुपये पार , खाद्यतेल २०० रुपये झाले आहे पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीच्या परिणाम अन्य वस्तूंच्या वाहतूक खर्चावर झाला असून अन्य वस्तूंच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत . भाजीपाला , अन्नधान्य , डाळी , गहू , तांदूळ यांच्या किमतीत वाढ झाली आहे . खाद्य तेलाच्या किमतीत ४० टक्के तर पेट्रोलिमय पदार्थ्याच्या किमतीत ३० टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे . त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला महागाईची मोठ्या प्रमाणात झळ बसत आहेत ही महागाईची झळ कमी होण्यासाठी पेट्रोल व डिझेल किमती जीएसटी अंतर्गत आणा , महागाई कमी करा या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडक दिली . प्रांताधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत सदस्यांनी परिसर दणाणून सोडला . त्यानंतर भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतानाच महागाईच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले . संघाच्या शिष्टमंडळाने -ांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेत राज्य सरकारने महागाईवर विविध उपाययोजना करून त्वरित नियंत्रण आणावे पेट्रोलियम पदार्थ्याच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणाव्यात , खासगी वाहतूक प्रवास भाड्यावर निर्बंध आणावेत , खाद्यतेल , डाळी , भाजीपाला आणि अन्नधान्य यांच्या किमती नियंत्रणात ठेवा या प -मुख मागण्यांसह अन्य मागण्यांचे निवेदन देखील सादर केले . यावेळी भारतीय मजदूर संघाचे कोकण विभागीय संघटनमंत्री हरी चव्हाण , संघाचे अध्यक्ष विकास गुरव , सचिव सत्यविजय जाधव कार्याध्यक्ष भालचंद्र साटम संघटनमंत्री ओमकार गुरव सुधीर ठाकूर उपाध्यक्ष अशोक घाडीगावकर , राजेंद्र आरेकर यांच्यासह १५० कामगार उपस्थित होते . या आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .