शिवराई रवळनाथ वि. का. स. संस्था हळवल चेअरमन पदी राजू राणे यांची बिनविरोध निवड.

शिवराई रवळनाथ वि. का. स. संस्था हळवल चेअरमन पदी राजू राणे यांची बिनविरोध निवड.

*कोकण Express*

*शिवराई रवळनाथ वि. का. स. संस्था हळवल चेअरमन पदी राजू राणे यांची बिनविरोध निवड..!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या शिवराई रवळनाथ वि. का. स. संस्था हळवल चेअरमन (अध्यक्ष) पदी राजू राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तब्बल ५२ वर्षांनी झालेल्या सोसायटी निवडणुकीत गाव पॅनल व शिवसेना पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनलचा एकतर्फी विजय झाला होता. त्यानंतर ही निवड सोसायटी कार्यालयात करण्यात आली. राजू राणे हे मागील १० वर्षे सोसायटी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आपल्या काळात त्यांनी विविध शेती कर्जे उपलब्ध करून तसेच शासनाच्या विविध योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केले होते. सुमारे १० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी प्रकाश घोगळे यांची निवड करण्यात आली.

यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व आपल्या काळात शेतकऱ्यांच्या हिताची कामे करा असे देखील सांगितले.

यावेळी सोसायटी निवडणूक निर्णय अधिकारी सुमती ढवळ, सचिव प्रज्ञा मेस्त्री, सहसचिव शशिकांत तेली, माजी युवा येईना जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, सदस्य जयसिंग राणे, गणेश राणे, संदीप गुरव, आप्पा ठाकूर, सुभाष राणे, पंढरी राणे, मिलिंद जाधव, राजश्री परब, शर्वरी राणे, जनार्दन डोबकर, माजी सरपंच रवी परब, अरुण राणे, सुभाष परब, विजय परब, मारुती सावंत, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!