*कोकण Express*
*नांदगाव श्री देव कोळंबा देवाची जत्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न*
सर्वांना आतुरता लागून राहिलेल्या राज्यासह परराज्यातील मोठा भक्त जन असलेली नवसाला पावणारा,हाकेला धावणारा अशी सर्वदूर ख्याती असलेल्या नांदगाव येथील श्री देव कोळंबा देवाची जत्रा रविवार मोठ्या भक्तिमय वातावरणात झाली असून या कोळंबा जत्रेला जनसागर उसळला होता
बा देवा कोळंबा महाराजा ….रक्षण कर असं सर्वांनी साकडं घातलं आहे.
होत असून यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.भक्तजनांना कमीत कमी वेळेत दर्शन मिळावे व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंडळाकडून नियोजन .
करण्यात आले आहे. रविवार हा नांदगाव चा आठवडा बाजार यात जत्रोत्सव ही रविवारी यामुळे सकाळपासून श्री.देव कोळंबाच्या जयजयकाराने संपूर्ण नांदगाव परिसर दणाणूण गेला होता. नवसफेडसाठी दर्शना साठी तसेच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.यावेळी भक्त गणांना मटण आणि भाकरी चा प्रसाद देण्यात आला आहे.
दुपार नंतर या जत्रेला दरवर्षी गर्दीचा उच्चांक वाढला जातो.यावेळी येणा-या प्रत्येक भाविकाला मटण भाकरीचा प्रसाद दिला जातो.हे या जत्रेचे वेगळेपण आहे.
यावर्षी नव्या स्वरूपात विद्युत रोषणाई व आकर्षक मंडप व्यवस्था करण्यात आली होती .पिण्याचे पाणी,प्रसादाच्या रांगा, मान्यवर कक्ष,स्वागत कमान,आरोग्य पथक स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आले होते . गेली दोन वर्ष कोरोनाकाळात साधेपणाने झालेला जत्रोत्सव यावर्षी दरवर्षीप्रमाणे जिल्हा वासीयांबरोर मुंबईकर चाकरमानी, राज्य व परराज्यातील लाखो भाविक यांनी हजेरी लावली होती.
यासाठी श्री. देव कोळंबाचे उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये, सर्व सहकारी ,ग्रामस्थ विशेष मेहनत घेतली होती.