*कोकण Express*
*विर्डी शिरशिंगे येथील रखडलेल्या धरणाची कामे सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार -आम.दिपक केसरकर*
तळेखोल विर्डी पंचक्रोशीतील शेतकरी बांधव सुखी झाला पाहिजे यासाठी आम्हाला प्रथम पाण्याची सोय करा पाणी नसल्याने शेती बागायती करता येत नाही गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या विर्डी धरणाचे काम सुरू करा अशी कैफियत तळेखोल गावातील ग्रामस्थ यांनी मांडली यावेळी आम.दिपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यातील विर्डी ,आणि सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे या दोन्ही धरणाची कामे सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा कामे सुरू करायला मान्यता द्यावी यासाठी मुंबई येथील बैठकित मुख्यमंञी यांची भेट घेऊन चर्चा करणार असे माजी पालकमंञी विद्यमान आम.दिपक केसरकर यांनी सांगितले.
आम.दिपक केसरकर एका कार्यक्रमासाठी तळेखोल गावात रविवारी सायंकाळी आले असता तळेखोल गावातील जेष्ठ शेतकरी गावातील ग्रामस्थ यांनी आम.दिपक केसरकर यांची भेट घेऊन आपली पाणी संदर्भात कैफियत मांडली.