*कोकण Express*
*खांबाळे दशवार्षिक सूक्ष्म नियोजन कार्यशाळेचे उद्घाटन गट विकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या हस्ते संपन्न*
*६ मे ते ९ मे या कालावधीत संपन्न होणार खांबाळे गावचे दशवार्षिक नियोजन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गावाचे सूक्ष्म नियोजन करून 10 वर्षाचे नियोजन आखुन ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, व्यावसायिक व भूमिहीन कुटुंबांना लखपती करण्याच्या उद्देशाने फक्त मागेल त्याला काम नाही तर “पाहिजे ते काम ” या उक्तीप्रमाणे दशवार्षिक नियोजन आराखड्यात कामांचा समावेश करून “मी समृद्ध तर गाव समृद्ध” पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना साध्य करणे अपेक्षित आहे. याकरीता जिल्हयातील एकूण 10 ग्रामपंचायतींची दशवार्षिक नियोजनाकरिता निवड करण्यात आलेली आहे. त्यात वैभववाडी तालुक्यात एकमेव खांबाळे गावाचा समावेश आहे. सदर कार्यशाळा दिनांक ०६ मे, २०२२ ते ०९ मे, २०२२ या कालावधीत संपन्न होणार आहे. यावेळी तहसिलदार रामदास झळके, गट विकास अधिकारी जयप्रकाश परब, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी उपस्थितांना संबोधित करून या संपूर्ण योजनेची विस्तृतपणे माहिती दिली.
यावेळी सरपंच गौरी पवार, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी सभापती शुभांगी पवार, उपसरपंच गणेश पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. वडर, आरोग्य विस्तार अधिकारी श्री. चव्हाण, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे, बचतगट तालुका समन्वयक श्री. सावंत, मुख्य सेविका विद्या गुरखे, सामजिक वनीकरणच्या विद्या जाधव, विस्तार अधिकारी सांख्यिकी विशाल चौगुले, ग्रामपंचायत सदस्य तथा सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड, मंगेश गुरव, रसिका पवार तसेच रोजगार हमी कक्षाचे तालुका सहाय्यक स्थापत्य अमित चव्हाण, तांत्रिक सहायक कृषी अधिकारी साईप्रसाद तेली, सिडीईओ मिलिंद खोबरेकर, ग्रामसेवक शिवाजी कदम, श्री. कांबळे, रोजगार सेवक मंगेश कांबळे तसेच गावातील सर्व कर्मचारी व ग्रामस्थ, महिला, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, सीआरपी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचतगट अध्यक्ष- सचिव बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संगणक परिचालक रुपेश कांबळे यांनी मानले.