कणकवली शहरातील सर्विस रस्त्यांवरील अनधिकृत दुकाने, पार्किंग वर कारवाई करा

कणकवली शहरातील सर्विस रस्त्यांवरील अनधिकृत दुकाने, पार्किंग वर कारवाई करा

*कोकण Express*

*कणकवली शहरातील सर्विस रस्त्यांवरील अनधिकृत दुकाने, पार्किंग वर कारवाई करा*

*आमदार नितेश राणे यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शहरातील सर्विस रस्त्यासह पटवर्धन चौकात जागोजागी अनधिकृत वाहने पार्किंग करून वाहतुकीस होत असलेल्या अडथळा प्रश्नी अखेर आमदार नितेश राणे यांनी स्वतः लक्ष घातले आहे. आज पटवर्धन चौकातून जात असताना आमदार नितेश राणे यांनी कणकवली पटवर्धन चौकात थांबून तेथे कार्यरत असणाऱ्या वाहतूक पोलीस चंद्रकांत माने यांना अनधिकृतपणे वाहने पार्किंग करणार्‍यांवर कडक कारवाई करा अशा सूचना दिल्या. तसेच कोणीही व कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी असू दे कारवाईसाठी मागेपुढे पाहू नका अशा सूचना देखील श्री राणे यांनी दिल्या. सर्वीस रस्त्यावर अनधिकृतपणे केल्या जाणाऱ्या दुचाकी पार्किंग किंवा चार चाकी, कार पार्किंग मुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक दुकाने देखील सर्विस रस्त्यावर थाटली आहेत. या संपूर्ण अनधिकृत पार्किंग व रस्त्यावर थाटलेल्या दुकानांवरही कारवाई च्या सूचना श्री राणे यांनी दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राजू हिर्लेकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!