गांगो गवळदेव मंदिराचा सहावा वर्धापन दिन ८ मे रोजी

गांगो गवळदेव मंदिराचा सहावा वर्धापन दिन ८ मे रोजी

*कोकण Express*

*गांगो गवळदेव मंदिराचा सहावा वर्धापन दिन ८ मे रोजी…!*

*जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस यांच्या महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन….!*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हलवल भाकरवाडी येथे श्री देव गांगो गवळदेव मंदिराचा सहावा वर्धापनदिन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांच्या हाकेला धावणारा आणि संकटी पावणाऱ्या गांगो गवळदेव मंदिराचा ८ मे रोजी सहावा वर्धापन दिन संपन्न होत आहे.

तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळींसह उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा. असे मंडळाकडून निमंत्रित करण्यात आले आहे.

◾ *८ मे रोजी विविध कार्यक्रम पुढीलप्रमाणे:*

▪️ *सकाळी*
१) ५:०० ते ६:०० काकड आरती
*२) ८:०० वा सत्यनारायण महापूजा*
३)१०:०० वा.आरती व तिर्थप्रासाद
४) ११:०० ते १:०० हरिपाठ कीर्तन
*(बुवा ह.भ.प.रविकांत ठाकूर)*

▪️ *दुपारी*
५) १:०० ते २:०० महाप्रसाद
६) ३:०० ते ८:०० स्थानिकांची सुस्वर भजने

▪️ *रात्रौ*
७) ८:३० वा. महाप्रसाद
८) रात्रौ ९:३० वा. सत्कार समारंभ
९) रात्रौ ठीक ९:३० वा.
*जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस (दांडेली) यांचा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग* होणार आहे. सर्व भाविकांनि व नाट्यरसिकांनी उपस्थित राहावे असे मंडळाकडून निमंत्रीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!