*कोकण Express*
*करंजे ,नागवे ,साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालयाचा उद्या रौप्य महोत्सव*
*कासार्डे:संजय भोसले*
तांबे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलीत करंजे, नागवे ,साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय या प्रशाळेला 21 जून 2022 ला पंचवीस वर्षे पूर्ण होत असल्याने या वर्षी संस्था प्रशाला, व माजी विद्यार्थी संघटना तसेच आजी माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्ष उत्साहवर्धक वातावरणात 07 मे 2022 रोजी विद्यालयाच्या मातोश्री सुगंधा तांबे रंगमंचावर, संस्थापक प्रोफेसर आर .एल. तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात येत आहे.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन व शालेय स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या वतीने शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, देणगीदार यांचा सत्कार आयोजित केला असून आजी-माजी विद्यार्थी ,शालेय कर्मचारी यांच्या सहविचार सभेचे ही आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री ठीक 9.०० वाजता शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन व ग्रामदेवता दशावतार नाट्य मंडळ बिडवाडी, यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाई तवटे (हिंदुस्तान पेट्रोलियम मुंबई चे निवृत्त अधिकारी), मंगेश सावंत (शाखा अभियंता पंचायत समिती पनवेल), महादेव वावळे (निवृत्त पोलिस अधिकारी ),दीलीप ढवण (उद्योजक )अनिल घोणे (निवृत्त अधिकारी हायकोर्ट मुंबई )समीर घोणे (शिक्षण प्रेमी ),मोहन तळगावकर( सामाजिक कार्यकर्ते), अभय तांबे (उपाध्यक्ष तांबे एज्युकेशन सोसायटी), संस्था विश्वस्त सौ अनघा तांबे, सौ प्रज्ञा सर्पे,सौ प्रणाली मोहिते, श्रीमती सुजाता पवार ,कुमारी प्राजक्ता तांबे ,शाखा सचिव कणकवलीचे प्रदीप सर्पे,डॉक्टर वसंत सावंत (सल्लागार) सौ रश्मी सोगम ,(मुख्याध्यापिका राजर्षी छत्रपती शाहू महाराज मतिमंद विद्यालय करंजे), मंगेश जळगावकर (सरपंच करंजे), नारायण गाडेकर (सरपंच नागवे), आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक एस. डी . चोडणकर यांनी केले आहे.

