*कोकण Express*
*सिंधुदुर्गात भविष्यातील तिसरा आमदार सुद्धा शिवसेनेचाच असला पाहिजे…*
*संजय पडते; शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा सावंतवाडीत शुभारंभ…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
भविष्यात सिंधुदुर्गातील विधानसभेत तिसरा आमदार सुद्धा शिवसेनेचाच असला पाहिजे,यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पुढाकार घ्यावा,व तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून जास्तीत-जास्त सदस्य नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे केले.शिवसेनेच्या माध्यमातून राज्यभर सुरू असलेल्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आज सावंतवाडीतही करण्यात आला.याप्रसंगी श्री.पडते बोलत होते.
यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख आप्पा पराडकर,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,महिला जिल्हाप्रमुख जानव्ही सावंत,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,शहरप्रमुख बाबू कुडतरकर,मायकल डीसोजा,शब्बीर मणियार,अपर्णा कोठावळे,भारती मोरे,योगेश नाईक,गुणाजी गावडे,सागर नाणोसकर,प्रशांत कोठावळे, नारायण राणे,सुरेंद्र बांदेकर,रक्ष्मी माळोदे आदी आदींसह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्री.सावंत म्हणाले, आम्हाला व्हाट्सअप किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून संघटना वाढवायची नाही आहे.त्यामुळे केवळ यावर अवलंबून न राहता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा आणि त्याला विश्वासात घेऊनच नाव नोंदणी करा .जेणेकरून त्याचा फायदा भविष्यातील निवडणुकांमध्ये पक्षाला होईल,पहिल्यांदा पाया मजबूत करा ,आणि नंतरच त्यावर कळस उभारा ,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.