*कोकण Express”
*तळेरे हायस्कूलच्या हरेश कोळेकर चे जिल्हास्तरीय “मी शिक्षक होणार” या स्पर्धेत अभिनंदनीय यश*
*कासार्डे : संजय भोसले*
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती मालवण शाखा आयोजित “मी शिक्षक होणार” या जिल्हास्तरीय स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे चा ,इयत्ता पाचवीतील विद्यार्थी हरेश संदीप कोळेकर. याने जिल्हास्तरावर उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले .प्राथमिक शिक्षक भारती मालवण शाखे अंतर्गत “मी शिक्षक होणार” या ऑनलाइन जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते .हरेश कोळेकर याने मानवी ज्ञानेंद्रियाचे अध्यापन करतानाचा दहा मिनिटांचा व्हिडिओ या स्पर्धेसाठी पाठविला होता .यामध्ये त्याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या यशाबद्दल हरेश कोळेकर तळेरे विद्यालयाचे शाळा समिती सदस्य प्रवीण वरुडकर, शरद तळेकर ,निलेश सौरप, मुख्याध्यापक एस. जी. नलगे , अविनाश मांजरेकर,सी.व्ही. काटे,एन. बी. तडवी ,डी. सी. तळेकर,पी. एन.काणेकर, पी .एम. पाटील ,ए. पी.तांबे,आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.