*कोकण Express*
*सातरल – कासरल सोसायटीवर भाजपचा झेंडा*
*नवनिर्वाचित संचालकांचे गोट्या सावंत, संतोष कानडे यांच्या कडून अभिनंदन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गेले काही महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील सुरू असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी च्या निवडणुकीमध्ये कणकवली तालुक्यात भाजपने आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. कणकवली तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सातरल – कासरल सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाने 11 जागा मिळवत विजय मिळवल्याची माहिती भाजप कडून देण्यात आली. विजयी संचालकांचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, माजी सरपंच संदीप सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट घेत अभिनंदन केले.

