*कोकण Express*
*जिल्हा बँकेवर आरोप नको,खुशाल चौकशी करा…*
*जिल्ह्यातील १८ हजार शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ…*
*जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
नाबार्ड कडुन कौतूक करण्यात आलेल्या जिल्हा बँकेची काही जणांकडुन बदनामी करण्याचे काम सुरू आहे.निवडणूका तोंडावर आल्याने हा प्रकार सुरू आहे.मात्र जे आरोपीच्या पिंजर्यात आहेत,त्यांनी टिका करणे कीतपत योग्य,असा सवाल शिवसेनेचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी आज येथे केला.दरम्यान शासनाकडुन जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील अठरा हजार शेतकर्यांना होणार आहे.तब्बल ३४ कोटी रुपये माफ होणार आहेत.तर दुसरीकडे नियमित कर्ज भरणार्यांना प्रोत्साहन म्हणून तब्बल ५२ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्री.सावंत म्हणाले,या ठिकाणी गेले काही दिवस जिल्हा बँकेवर नाहक आरोप केले जात आहे. येणार्या निवडणूका लक्षात घेवून हा प्रकार सुरू आहे. मात्र काही झाले तरी आम्ही घाबरत नाही.
आमच्यावर आरोप करणार्या मागे आमदार नितेश राणेंच आहेत. त्यांच्याच तोंडुन रविंद्र चव्हाण बोलत आहेत. मात्र आम्ही कोणतेही काम चुकीचे केलेले नाही. त्यामुळे नाहक एखाद्या संस्थेच्या विरोधात आरोप करण्यापेक्षा खुशाल चौकशी करावी.
ते पुढे म्हणाले,उद्या आपण पत्रकार परिषद घेवून आरोपाचे खंडन करणार आहे. त्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर द्यायचे नव्हते. परंतू दुसरी बाजू यायला हवी, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेत आहे. परंतू त्यांच्या मागे केवळ निवडणूका आहेत, असे ही सावंत म्हणाले. यावेळी जिल्हा उपसंघटक शब्बीर मणीयार उपस्थित होते.