*कोकण Express*
*शाळेचा “आयएसओ” मानांकन प्राप्त सोहळा दिमाखात…*
*माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शहरातील चार नंबर शाळेच्या अद्ययावत सभागृहाला आणि बसविण्यात येणाऱ्या सोलर सिस्टीमसाठी लागणारा सर्व निधी लवकरच उपलब्ध देईन, असे आश्वासन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिले. दरम्यान येथील शाळेला पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे हा प्रश्न येत्या काही दिवसातच सोडविला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. ४ च्या आयएसओ मानांकन प्राप्त सोहळा कार्यक्रमात श्री.केसरकर बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, उमा वारंग आदी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले,ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेला आज आयएसओ मानांकन मिळाले आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तसेच या शाळेतील पाण्याचा प्रश्न येत्या काही दिवसातच आपण निश्चितच सोडवू आणि शाळेला आवश्यक असणारे पटांगण नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल का? याचाही निश्चितच विचार करू, असे आश्वासनही श्री परब यांनी यावेळी उपस्थितांना दिले.