“कणकवली दारीस्ते एसटी सुरु करा”-शिवसेनेची मागणी

“कणकवली दारीस्ते एसटी सुरु करा”-शिवसेनेची मागणी

*कोकण Express*

*”कणकवली दारीस्ते एसटी सुरु करा”-शिवसेनेची मागणी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळापासुन कणकवली दारीस्ते एसटी बस सेवा आजपर्यंत बंद आहे. यामुळे शाळेतील मुलांची, रुग्णांची, वयोवृद्धांची तसेच पंचक्रोशीतील सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. खाजगी वाहनाने प्रवास करणे सर्वसामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. कणकवली दारीस्ते एसटी सेवा आजपर्यंत बंद असल्याने लोकांचे हाल होत असुन त्वरीत हि बस सेवा पूर्ववत करावी अशी जनतेची मागणी आहे.
या मागणीची दखल घेऊन सिंधुदुर्ग युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, कणकवली युवासेना उपतालुकाप्रमुख उत्तम लोके, शाखाप्रमुख लवू पवार, बंड्या सावंत यांनी आज कणकवली आगार व्यवस्थापक श्री.प्रमोद यादव यांची भेट घेऊन कणकवली दारीस्ते एसटी बस त्वरीत सुरु करण्याची शिवसेनेच्या वतीने मागणी केली. यावेळी आगार व्यवस्थापक श्री.यादव यांनी सदरची मागणी मान्य करुन एसटी बस सुरु करण्यात येईल असे आश्वासन उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!