*कोकण Express*
*कुडाळ नगरपंचायतीवर बसलेल्या सौर विद्युत संचाचे आज लोकार्पण…*
*नगराध्यक्ष तेलींच्या हस्ते शुभारंभ…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
येथील नगरपंचायतीच्या इमारतीवर सौर विद्युत संचाच्या पूर्ण झालेल्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले.दरम्यान शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा विकास योजने अंतर्गत कुडाळ नगरपंचायतीच्या इमारतीवर सौर विद्युत संच बसवण्यासाठी मंजुरी मिळाली होती.या कामास जिल्हा वार्षिक योजनेतून १० किलो वॅट क्षमतेचा सौर विद्युत संच नगरपंचायत इमारतीवर बसवून काम पूर्ण करण्यात आले.
याप्रसंगी श्री तेली म्हणाले,या प्रकल्पा अंतर्गत १० किलो वॅट क्षमतेची विज निर्मिती होणार आहे. विजनिर्मिती बरोबर विजेची बचत होणार आहे.ही कामे पूर्णत्वास आल्याने कुडाळच्या विकासात भर पडणार आहे, असे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर, नगरसेवक विनायक राणे, सुनील बांदेकर,संध्या तेरसे, उषा आठल्ये, अश्विनी गावडे, सरोज जाधव, बाळा वेंगुर्लेकर, तसच प्रशासकीय अधिकारी सुरेल परब, विशाल होडवडेकर, संदीप कोरगावकर, श्री आजगावकर,श्री हेरेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.