*कोकण Express*
*वागदे सरपंच पूजा घाडीगवकर यांचा भाजपात प्रवेश…!*
*आ.नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत…!*
*भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का…!*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
वागदे गावच्या सरपंच पूजा घाडीगांवकर, शिवसेना शाखा प्रमुख सुहास गावडे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी सेनेला जय महाराष्ट्र केला आहे.शेकडो शिवसैनिकांनी आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.या सर्व शिवसेना कार्यकर्त्यांचे आ.राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भाजप उपाध्यक्ष गोट्या सावंत,कणकवली तालुका अध्यक्ष श्री. मिलिंद मेस्त्री, वागदे शक्ती केंद्र प्रमुख संदीप सावंत,समीर प्रभुगावकर,संतोष गावडे,लक्ष्मण घाडीगांवकर, संदीप मेस्त्री, सुभाष मालाडकर,शशी राणे,महेश सरगळे, सूर्यकांत घाडीगांवकर, सचिन पारधीये आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. वागदे सरपंच पुजा उमेश घाडीगांवकर,ग्रा. प.सदस्य विजय सराफ ,सुहास गावडे,लिलाधर गावडे,तेजस्वीनी गावडे ,उमेश घाडीगांवकर, शरद गावडे, गणेश गावडे – टेबवाडी,रमेश गावडे,गंगाराम घाडीगांवकर, संजना सुहास गावडे,समीरा संतोष गावडे,संजय घाडीगांवकर, सूर्यकांत घाडीगांवकर ,दिपक पुंडलीक घाडीगांवकर, मंगेश जाधव, स्वरा संदेश गावडे,वनीता अशोक गावडे,मनाली मधुकर गावडे, मिलींद बच्चाराम घाडीगांवकर, ऐश्वर्या रोहीत जाधव,इंदीरा विष्णु गावडे अनिता गणपत गावडे,चंद्रभागा काशीराम गावडे आधी शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेऊन भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.