*कोकण Express*
*दोडामार्गात शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला शुभारंभ…*
तालुक्यातील शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आज येथील शिवसेना कार्यालयात पक्ष तालुका निरीक्षक डाॅ.जयेंद्र परुळेकर, तालुका प्रमुख बाबुराव धुरी,जिल्हा पदाधिकारी गणेश प्रसाद गवस,जि.प सदस्या संपदा गवस,उपतालुकाप्रमुख संजय गवस,माजी नगराध्यक्ष सौ.कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू ह्रदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी तालुका कार्यकारिणी सदस्य,महिला सदस्य व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तालुक्यातून तीनही जिल्हा परिषद मतदारसंघातून आणि शहरातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी व्हावी, यासाठी कार्यरत होण्याचे आवाहन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यावेळी बोलताना डॉ. परुळेकर यांनी केले.