*कोकण Express*
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवणच्या तालुकाध्यक्ष पदी सुयोग धामापूरकर यांची निवड, तर सचिवपदी जीवन हजारे*
*मालवण ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवणचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवणचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कुल पोईप – विरण येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन कदम यांच्या अध्यक्षतेखाली व उदघाटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर , जेष्ठ सल्लागार भाई चव्हाण, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी व्यासपिठावर अन्य जिल्हा प्रवक्ता सुनिल चव्हाण, शिक्षक नेते नंदकुमार राणे, राज्य महिला सल्लागार सुरेखा कदम, कार्याध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, प्राथ शिक्षक पतपेढी अध्यक्ष नामदेव जांभवडेकर, प्राथमिक शिक्षक पतपेढी उपाध्यक्ष निलम बांदेकर , मालवण सल्लागार श्रीकृष्ण सावंत, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी निकिता ठाकूर , जिल्हसचिव महिला आघाडी वैभवी कसालकर, वैभववाडी पतपेढी संचालक संतोष मोरे, संचालक आनंद तांबे, संचालक मालवण राजेंद्रप्रसाद गाड, जिल्हा सल्लागार सुगंध तांबे, कणकवली शिक्षक नेते गिल्बर्ड फर्नाडिस, मालवण शिक्षक नेते मंगेश कांबळी ,मालवण अध्यक्ष रुपेश गरुड , मालवण सचिव नवनाथ भोळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश झाडे, जिल्हा उपाध्यक्ष तुषार आरोसकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकृष्ण कांबळी, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजन जोशी, वेंगुर्ले अध्यक्ष सिताराम लांबर, कणकवली अध्यक्ष टोनो म्हापसेकर, देवगड अध्यक्ष सचिन धुरी, सावंतवाडी अध्यक्ष सतिश राऊळ, कणकवली सचिव महेंद्र पवार, कणकवली माजी अध्यक्ष विनायक जाधव, मालवण तालुका महिला आघाडी अध्यक्षा नेहा तांबे, मालवण तालुका महिला आघाडी सचिव भाग्यश्री वाडकर, राजेंद्र कडूलकर, राजेंद्र कवडे, आदी मान्यवर व बहुसंख्य समिती पाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रुपेश गरुड यांनी केले, अहवाल वाचन तालुका सचिव नवनाथ भोळे यांनी केले या कार्यक्रमात शिष्यवृत्तीमधील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार, बुद्धिबळ स्पर्धेतील यशस्वी मुलांचा व शिक्षकांचा सत्कार, आ दर्श पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षकांचा सत्कार, सेवानिवृत शिक्षकांचा सत्कार, मालवण संचालक राजेंद्रप्रसाद गाड यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार , आदी सत्कार करण्यात आले.
तसेच सन २०२२ ते सन २०२५ या पुढील तीन वर्षाकरिता तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली मालवण तालुका अध्यक्ष सुयोग धामापूरकर, उपाध्यक्ष महादेव असरोंडकर, सचिव जीवन हजारे, कार्याध्यक्ष रुपेश गरूड, कोषाध्यक्ष राजेंद्रप्रसाद गाड, शिक्षक नेते मंगेश कांबळी, प्रवक्ता नवनाथ भोळे. यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रामचंद्र कुबल व समिक्षा सर्पे तर आभार नवनाथ भोळे यांनी मानले.