*कोकण Express*
*मळेवाड कोंडूरे येथे ग्राम सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे यांच्या सहकार्याने व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे आयोजित 30 एप्रिल ते 4 मे असा भव्य ग्राम सांस्कृतिक महोत्सव 2022 आयोजीत केला आहे.
दरवर्षप्रमाणे याही वर्षी मळेवाड जकातनाका येथे ग्राम सांस्कृतिक महोत्सव 2022 चे आयोजन केले आहे.या महोत्सवातील कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.
पहिला दिवस दिनांक 30/04/2022
सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायण पूजा व तीर्थप्रसाद संध्याकाळी 3 ते 6 महिल व मुलासाठी फनी गेम व महीलासाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम.
रात्री 7 वाजता निमंत्रित भजन मंडळांचा कार्यक्रम
दुसरा दिवस 01/05/2022
सकाळी आठ वाजता रक्तदान शिबिर रात्री नऊ वाजता शिर्डी माझे पंढरपुर दशावतारी नाट्यप्रयोग.
तिसरा दिवस 02/05/2022
रात्री नऊ वाजता सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ रेकॉर्ड डान्स स्पर्धा वेशभूषा स्पर्धा व महिलांचा नाट्यप्रयोग
चौथा दिवस 03/05/2022
रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा
पाचवा दिवस
04/05/2022
युवतींची कोकण सुंदरी 2022 ही सौंदर्य स्पर्धा तसेच लहान मुलांचा फॅशन शो होणारं आहे.तरी या महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच मिलन पार्सेकर व उपसरपंच तथा मंडळाचे अध्यक्ष हेमंत मराठे यांनी केले आहे.