जिल्हा बँकेचा गैरवापर करून  भाजपामध्ये घेतला प्रवेश करुन

जिल्हा बँकेचा गैरवापर करून  भाजपामध्ये घेतला प्रवेश करुन

*कोकण Express*

*जिल्हा बँकेचा गैरवापर करून  भाजपामध्ये घेतला प्रवेश करुन…*

*भाजपमध्ये प्रवेश केला नाही तर तुमच्या मुलाची नोकरी घालविन अशी धमकी…*

*शिवसेना नेते सतीश सावंत यांचा आम. नितेश राणेंवर गंभीर आरोप*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

कणकवली तालुक्यात नितेश राणे व त्यांचे सहकारी जिल्हा बँकेचा वापर करून काही जणांचे भाजपामध्ये प्रवेश घेत आहेत. यामध्ये नागवे सरपंच यांचा मुलगा जिल्हा बँकेत कंत्राटी पद्धतीवर कामाला आहे. भाजपमध्ये प्रवेश केला नाही तर तुमच्या मुलाची नोकरी घालविन अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केला. मुलांची नोकरी वाचवण्यासाठी नागवे सरपंच यांनी नाईलाजास्तव भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा सतीश सावंत यांनी केला. तर करंजे येथील राजेंद्र चिंदरकर हे देखील जिल्हा बँकेमध्ये कंत्राटी पद्धतीने कामाला आहेत. त्यांनादेखील अशी धमकी देण्यात आली. घोनसरी येथील एका शिवसैनिकाचे जिल्हा बँकेत कर्ज आहे. कर्ज थकीत प्रकरणी घर जप्तीची नोटीस काढून त्याचा देखील भाजपामध्ये प्रवेश घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे हे “नोकरी बचाव भाजप बढाव” अशा पद्धतीने काम करत असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केला. कणकवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत श्री सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना समन्वयक राजू राठोड, युवासेना उपतालुका प्रमुख उत्तम लोके आदी उपस्थित होते.
गेली साडे सहा वर्ष मी चेअरमन असताना जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण केव्हाही आणलेलं नाही. नितेश राणे यांचे चुलत भाऊ जिल्हा बँकेत आहेत. सचिन पारधीये सारखा चिखलफेक प्रकरणात आरोपी असलेला राणेंचा कार्यकर्ता असूनही त्याच्या पत्नीला देखील आम्ही कामावरून काढलं नाही. कुणाची रोजीरोटी हिसकाऊन पोटावर पाय आणणे ही आमची व शिवसेनेची संस्कृती नाही. असेही श्री सावंत यांनी सांगितले. राणे भाजपाकडून नोकऱ्या काढुन घेत भाजपा वाढवण्याचा सिंधुदुर्गात प्रयत्न सुरू असल्याचा आरोप श्री सावंत यांनी केला. वैभववाडी येथील एका कार्यकर्त्याला मुलाची नोकरी वाचवण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आल्याचा आरोप श्री सावंत यांनी केला. तसेच जिल्हा बँकेच्या हिताच्या ऐवजी बँकेच्या मुख्य कार्यालयात आमदार नितेश राणे यांनी स्वतःचा संपर्क कार्यालय सुरू केल्याची टीका श्री सावंत यांनी केली. नितेश राणे यांनी जिल्हा बँक हा राजकीय अड्डा बनवल्याची घणाघाती टीका देखील श्री सावंत यांनी केली. या संपूर्ण प्रकरणी आमचे आठही संचालक व सुशांत नाईक हे आक्रमकपणे निश्चितपणे आवाज उठवतील असा दावा श्री सावंत यांनी केला. जिल्हा बँकेत सुरू असलेल्या या सर्व संदर्भात सहकार खात्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई हे या संपूर्ण प्रकरणी कारवाई करत नसल्याचा आरोप देखील श्री सावंत यांनी केला. अनिरुद्ध देसाई यांची देखील तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी आमचं काम केलं याचा राग धरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नितेश राणे यांच्या दबावाखाली येत काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याचा आरोप त्यांनी केला. काही कर्मचाऱ्यांना सोसायटी निवडणुकीच्या मतदानाला ही पाठवलं जात नसल्याचा दावा श्री सावंत यांनी केला. आमदार नितेश राणे हे बेनामी चेअरमन बनून जिल्हा बँकेचा कारभार हाकत आहेत व मनीष दळवी हे बाहुले बनून चेअरमन म्हणून काम करत असल्याचा खरमरीत टोला देखील श्री सावंत यांनी लगावला. बोलेरो गाड्या खरेदी प्रकरणात कर्जदारांच्या सातबारावर बोजा चढविण्यास जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्ज प्रमुख टाळाटाळ करत असल्याचा आरोप श्री सावंत यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नियमित नोकर भरती व्हावी याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेची सत्ता आल्यानंतर गेल्या शंभर दिवसात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेचा मनमानी कारभार सुरू झाल्याचा आरोप श्री सावंत यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!