ज्येष्ठ विचारवंत प्रा. रमाकांत यादव यांना वैभववाडीवासियांनी वाहीली श्रद्धांजली

*कोकण Express*

*ज्येष्ठ विचारवंत प्रा. रमाकांत यादव यांना वैभववाडीवासियांनी वाहीली श्रद्धांजली..*

वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्या वतीने शोकसभेचे आयोजन

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

  आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्रा. रमाकांत यादव यांच्या निधनाने संघटनेची मोठी हानी झाली आहे. एक थोर मार्गदर्शक हरपला असल्याची प्रतिक्रिया येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात पार पडलेल्या शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केली. वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ यांच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. यादव यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

या सभेला मुंबई अध्यक्ष यशवंत यादव, सेक्रेटरी प्रा. देवेंद्र यादव, ज्येष्ठ सल्लागार धनाजी जाधव, चंद्रकांत जाधव, अमित कांबळे, कमलेश भोसले यांनी मुंबईहून  ऑनलाइन सहभाग घेत आपले विचार मांडले.  या शोकसभेला कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, सचिव रवींद्र पवार, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, संतोष कदम, संजय जाधव, भास्कर जाधव, संजय जंगम, अंकुश कदम, गौतम तांबे, चंद्रकांत जाधव  व संघटनेचे सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!