शिरोडा रेडी परिसरात अचानक अवकाळी पावसामुळे घरावर आंब्याचे झाड पडुन 50,000 चे नुकसान

शिरोडा रेडी परिसरात अचानक अवकाळी पावसामुळे घरावर आंब्याचे झाड पडुन 50,000 चे नुकसान

*कोकण Express*

*शिरोडा रेडी परिसरात अचानक अवकाळी पावसामुळे घरावर आंब्याचे झाड पडुन 50,000 चे नुकसान*

*वेंगुर्ले : प्रतिनिधी*

वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा व रेडी परिसरात काल रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे झाडे तुटून पडून अनेकांचे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे रेडी हुडा येथील नारायण सिताराम शेटकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडुन अंदाजे 50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली.
गेले काही दिवसांपासून अचानक येत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे.सोमवारी 26 एप्रिल रोजी विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट करीत आलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याच दरम्यान परिसरातील खंडित झालेला वीजपुरवठा आज सकाळी पूर्ववत झाला. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना रात्रभर उष्णतेचा सामना करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!