नांदोस सोसायटी निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे आ. वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

नांदोस सोसायटी निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे आ. वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

*कोकण Express*

*नांदोस सोसायटी निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे आ. वैभव नाईक यांनी केले अभिनंदन*

*नांदोस गावच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन*

नांदोस ग्रामपंचायत येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देत नांदोस सोसायटी निवडणूकित विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी गावातील विकास कामांचा आढावा घेतला. तसेच नांदोस गावच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन आ. वैभव नाईक यांनी दिले.

मालवण तालुक्यातील नांदोस सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून या सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.सोसायटीचे माजी चेअरमन अशोक नांदोस्कर यांच्या नेतृत्वाखाली १३ पैकी १३ जागांवर शिवसेना पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये अशोक नांदोस्कर, शैलेश बिबवणेकर, विश्वनाथ डिकवलकर, महेश घाडीगावकर, बाळकृष्ण खरात, गणेश मांजरेकर, विजय पार्टे, दीपक शंकरदास, अपर्णा कदम, सुहासिनी चव्हाण, बाबल नांदोस्कर, दशरथ खरात, गणेश नांदोस्कर हे १३ उमेदवार निवडून आले आहेत.

यावेळी सरपंच आरती नांदोस्कर, शाखा प्रमुख राजू गावडे, पोईप विभागप्रमुख विजय पालव, बाळा महाभोज, भाऊ चव्हाण, कृष्णा पाटकर, बाबू टेंबुलकर ,श्री. काळसेकर, निलम पार्टे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!