नगरपंचायतमध्ये सत्ता येताच कणकवलीत नवीन डीपी रस्ता जनतेच्या सेवेत

नगरपंचायतमध्ये सत्ता येताच कणकवलीत नवीन डीपी रस्ता जनतेच्या सेवेत

*कोकण Express*

*नगरपंचायतमध्ये सत्ता येताच कणकवलीत नवीन डीपी रस्ता जनतेच्या सेवेत..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नगरपंचायतमध्ये सत्ता आल्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या नगरपंचायत मधील सत्ताधारी टीम मार्फत कणकवली शहरातील नवनवीन रस्ते विकसित करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात आला. कणकवली शहरातील यापूर्वी अनेक रस्ते डीपी प्लानमध्ये होते ते प्रत्यक्षात कार्यान्वित केल्यानंतर आता कणकवली शहरात अजून एक नवीन डीपी रस्ता जनतेच्या सेवेत येणार आहे. जेणेकरून या नवीन डीपी रस्त्यामुळे सुमारे एक ते दीड किलोमीटरचे अंतर कमी होऊन कणकवली शहरातील जनता व कणकवली कॉलेज, हायस्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या नव्या डीपी रस्त्याचा उपयोग होणार आहे.

कणकवली कॉलेज रोड- संजीवनी हॉस्पिटल ते कणकवली तेली आळी संतोष सावंत यांच्या घराकडील कडील या नवीन डीपी रस्त्याला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे. हा रस्ता संजीवनी हॉस्पिटल ते टिकले कॉम्प्लेक्स (मनोहर स्वरूप) बिल्डिंग पर्यंत झालेला होता. या रस्त्याचे नव्याने 9 मीटर रुंदीचे डांबरीकरण देखील करण्यात आले. मात्र त्यापुढील तेली आळी रस्त्याला हा रस्ता जोडलेला नव्हता, नगरपंचायत च्या डीपी प्लान मध्ये 9 मीटर रुंदीचा असलेला हा रस्ता आता प्रत्यक्षात होण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा झाला आहे. टिकले कॉम्प्लेक्स ते तेली आळी डीपी रस्त्यासाठी लागणाऱ्या जमीन मालकांची संमतीपत्रे नगरपंचायतला प्राप्त झाली आहेत. या रस्त्यात येणाऱ्या जमीन मालकांनी कणकवली शहराच्या विकासाच्या दृष्टीने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने हा नव्याने रस्ता कार्यान्वित होणार आहे. मूळ असलेला रस्ता वगळता नव्याने सुमारे 80 मीटर लांबीचा रस्ता होणार असून, संजीवनी हॉस्पिटल कॉलेज रोड ते तेली आळी रस्त्यापर्यंत एकूण रस्त्याची लांबी ही सुमारे 310 मीटर असणार आहे. 80 मीटर नवीन रस्ता संमतीपत्र द्वारे नगरपंचायतच्या ताब्यात आला असून, पूर्वीचा 230 मीटर चा रस्ता हा टिकले कॉम्प्लेक्स पर्यंत कार्यान्वित होता. या रस्त्यामुळे कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांच्या डीपी रस्ते विकासाच्या संकल्पनेतील अजून एक रस्त्याला मूर्त स्वरूप येणार आहे. त्या दृष्टीने प्रत्यक्षात हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. सत्ता आल्यानंतर कणकवली नगरपंचायत हद्दीतील तेली आळी ते महामार्ग जोडणारा त्यावेळचा बहुचर्चित डीपी रस्ता, त्याचबरोबर मसुरकर किनई ते गांगो मंदिर हा रिंग रोडचा डीपी रस्ता तर टॅबवाडी ते रवळनाथ मंदिरापर्यंत रिंग रोडचा दुसरा टप्पा असे नवनवीन रस्ते कणकवली नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांकडून विकसित करण्यात आले. या नवीन खुल्या झालेल्या डीपी रस्त्यांमुळे कणकवली शहरातील वळणवळणाची सुविधा यामुळे अजून सोपी होणार आहे. या नव्याने केल्या जाणाऱ्या तेली आळी मध्ये जोडल्या जाणाऱ्या रस्त्यामुळे कणकवली कॉलेज कडून बस स्टैन्डला येणाऱ्या विद्यार्थी नागरिकांना सुमारे दीड किलोमीटरचा वळसा कमी होणार आहे. या नवीन डीपी रस्त्याच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले असून, 28 लाख 20 हजार रुपये किमतीचे नवीन रस्त्याचे काम असणार आहे.

9 मीटर रुंदी व त्यामध्ये गटार असे या रस्त्याचे स्वरूप असणार आहे. नगरोत्थान जिल्हास्तर या निधीतून कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांन मार्फत हे काम हाती घेण्यात आले असून लवकरच या कामाची प्रत्यक्षात सुरुवात देखील केली जाईल अशी माहिती नगरपंचायतीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!