*कोकण Express*
*माधवबागच्या ” ब्लड प्रेशर 24 तास मॉनिटरिंग ” शिबिराचे 21 ते 25 एप्रिल दरम्यान आयोजन*
*कणकवली, कुडाळ, सावंतवाडी मध्ये होणार तपासणी*
*अडीच हजारांची तपासणी फक्त 799 रुपयांत ; नावनोंदणी आवश्यक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
माधवबागच्या वतीने “ब्लड प्रेशर २४ तास मॉनिटरिंग” तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ही तपासणी २१ ते २५ एप्रिल या कालावधीत सकाळी ०९:३० ते ११:३० या वेळेत कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या तीनही शाखांमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे २ हजार ५०० रुपयांची ही तपासणी केवळ ७९९ रुपयात केली जाणार आहे. तर एका दिवशी एकाच रुग्णांची तपासणी केली जाणार असल्यामुळे आधी नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा व हार्ट अटॅक किंवा पॅरालीसीस सारखे आजार टाळावेत, असे आवाहन माधवबाग टीमच्या वतीने वतीने करण्यात आले आहे.
ही तपासणी केल्यामुळे २४ तासांच्या ब्लडप्रेशरची सरासरी, मानसिक ताण असल्याने ब्लडप्रेशर होण्याची शक्यता, ब्लडप्रेशरचा त्रास सुरू असूनही निदान न झालेली अवस्था, ब्लड प्रेशरच्या त्रासाने इतर अवयवांवर परिणाम होण्याची स्थिती, हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस होण्याची शक्यता, आदी आजारांचे निदान होते.
हार्ट अटॅकचे प्रमाण हे रात्री किंवा पहाटेच्या वेळेस जास्त असते अशावेळी वाढणारा रक्तदाब हा मृत्यू सूचक असतो. लक्षणे आणि योग्य तपासण्याद्वारे केलेल्या ब्लडप्रेशर आजाराच्या अचूक निदानामुळे रोगाची सद्यस्थिती कळून येते. त्यामुळे योग्य उपचाराची दिशा निश्चित करता येते. परिणामी ब्लड प्रेशर या आजारातून कायमचे मुक्त होऊन कोणत्याही औषधाशिवाय निरोगी आयुष्य जगता येते. त्यामुळे माधवबागच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा, तसेच अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी कुडाळ-9011328581, कणकवली-9373183888, सावंतवाडी-7774028185 या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.