अखेरीस उपोषण आश्‍वासनअंती तात्पुरते स्थगित

*कोकण Express*

*अखेरीस उपोषण आश्‍वासनअंती तात्पुरते स्थगित…*

*मळेवाड सिंधूरक्तमित्र प्रतिष्ठान अध्यक्ष हेमंत मराठे*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्या समोर छेडण्यात येणारे उपोषण आश्‍वासनअंती हेमंत मराठे यांनी तात्पुरते स्थगित केले आहे
कोलगावं बूर्डी पुल ते सावंतवाडी मळेवाड आरोंदा रेडी रस्ताचे डांबरीकरण काम मंजूर असून गेले कित्येक दिवस काम सुरू करण्यात आले नव्हते तसेच या मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झाला असून ठिकाणी भलेमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक मेटाकुटीस आले होते खराब रस्ता खड्ड्यांचे पसरलेले जाळे व रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे या मार्गावरील वाढलेली झाडी पडलेले खड्डे रखडलेले डांबरीकरणाचे काम हे त्वरित सुरू करावे अन्यथा 2 डिसेंबर 2020 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर एक्स-रे आंदोलन घेण्याचा इशारा निवेदनातून उपोषण छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते हेमंत रमाकांत मराठे यांनी दिला होता. उपोषणाच्या निवेदनानंतर निवेदनाची दखल घेत मंगळवार दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सावंतवाडी मळगाव निरवडे मळेवाड मार्गावर रस्त्याला पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली असून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याचे काम सुरू केले आहे. तसेच पंधरा दिवसात या मार्गावर मंजूर असलेले डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येईल. तरी आपण आपले नियोजन उपोषण मागे घेऊन सहकार्य करावे असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मराठ्यांना देण्यात आले. आपल्या मागणीनुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने आपण आपले 2 डिसेंबर चे उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे हे मराठे यानी अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र पावसाळ्यात पडलेले खड्डे हे जांभ्या दगडाने भरलेले होते मात्र आता खड्डे बुजत असताना खड्ड्यात घातलेले जांभा दगड पूर्णपणे काढून मगच खड्डे बुजवा. तसेच काम संथ गतीने न करता कामात सातत्य ठेवा. अन्यथा पुन्हा उपोषण छेडेन असा इशारा मराठेनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!