*कोकण Express*
*कळसुली देंदोनेवाडी प्रकल्पाला उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यामुळेच मिळाला 56 कोटींचा निधी*
*फुकाचे श्रेय घेण्याची शिवसेनेची जुनी खोड*
*राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांचा टोला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कळसुली देंदोनेवाडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कामांची सुप्रमा अनेक वर्षे प्रलंबित होती २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात व केंद्रात शिवसेना भाजपचे सरकार होते, जिल्ह्यात सत्ता तुमची होती, मग कळसुली देंदोनेवाडी प्रकल्पाला त्यावेळी आवश्यक निधी का आणला नाही,फक्त फुकाचे श्रेय लाटणे हा एककलमी कार्यक्रम शिवसेनेचा आहे, खासदार म्हणतात चार महिन्यांपूर्वी तेथील ग्रामस्थांना मी शब्द दिला होता त्यामुळे ५६ कोटी रुपये निधी प्राप्त झाला, हे दिशाभूल करणारे वक्तव्य असून देदोनेवाडी प्रकल्पाला जे ५६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्याचे संपूर्ण श्रेय युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांचेच आहे, त्यांनी हा प्रलंबित प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली व या प्रकल्पाची वस्तुस्थिती मांडली, आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकल्पाची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश दिले म्हणून हा ५६ कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे, आणि त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते झाले असताना पून्हा त्याच कामाचे शिवसेना नेत्यांनी भूमिपूजन करणे हे फक्त श्रेयासाठी व जनतेची दिशाभूल करून जिल्ह्यात फक्त शिवसेनाच विकास करू शकते हे भासविण्यासाठीच हे उपद्व्याप सुरु आहेत, जिल्ह्यात वा राज्यात एकट्या शिवसेनेचीच सत्ता असल्या सारखे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते वागत आहेत, त्यातूनच भूमिपूजन झालेल्या देदोनेवाडी प्रकल्पांतील रस्त्याच्या कामांचे पून्हा भूमिपूजन खासदारांच्या हस्ते करणे म्हणजे महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचा नेहमीचाच प्रयत्न, म्हणून त्यांना मी एकच सांगू इच्छितो की राज्यात सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना या तीन पक्षाचे सरकार आहे यांचे भान गेली दोन वर्षे शिवसेना या जिल्ह्यात विसरलेली आहे, याचा तात्पुरता आश्वाद ते घेत असतील तर आमचा विरोध नाही. मात्र पून्हा दोन वर्षांनीं निवडणूका या येणारच याचेही भान शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी ठेवणे गरजेचे आहे, जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचा विकास कामांसाठी निधी महाविकास आघाडीचे सरकार म्हणून येतो पण त्याचे श्रेय फक्त पालकमंत्री खासदार व आमदारच घेतात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नावांची ॲलर्जी असल्यासारखेच गेली दोन जिल्ह्यात सेनेचे नेते वावरताना दिसतात, राज्यात महाविकास आघाडी असली तरी प्रत्येक पक्षाला आपली पक्ष संघटना वाढीसाठी स्वातंत्र्य आहे, हे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, अजून दोन वर्षें सत्तेची शिल्लक आहेत त्यामुळे पुढील काळात तरी महाविकास आघाडी असल्यासारखे वागावे अन्यथा भविष्यात राजकीय परिस्थिती वेगळी होऊ शकेल.
ही परिस्थिती येऊ नये अशी जर शिवसेनेची मनापासून इच्छा असेल तिन्ही पक्षातील कोणत्याही नेत्याने विकास कामांसाठी निधी आणला तरी तो महाविकास आघाडीच्या माध्यमातून आला ही भूमिका तिन्ही पक्षांनी स्वीकारून जनतेसमोर जावे, देदोनेवाडी प्रकल्पांतील विकास कामांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने केला मात्र त्यावेळी तालुक्यातील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना याचे निमंत्रण दिले होते, काही कार्यकर्ते उपस्थितही होते, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा धर्म पाळते मग शिवसेनेलाच आमची ॲलर्जी का ? शिवसेनेला ही ॲलर्जी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असणार का ॽ याचे उत्तर आमदार खासदार यांनी द्यावे, कारण आप आपल्या पक्षाचे नेते कसे कसे वागतात यांच्यावर कार्यकर्त्यांचा बारीक लक्ष आहे, वेळ आली की हेच कार्यकर्ते नेत्यांना सुनावल्याशिवाय राहाणारे नाहीत,असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी सांगितले.