*कोकण Express*
*जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र ; तर दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांचा धडाका*
*सिंधुदुर्ग*
सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची शुक्रवारी अचानक कणकवली येथे बदली करण्यात आली आहे. तर कणकवली येथे तात्पुरते कार्यरत असलेले राजेंद्र हुलावले यांना सावंतवाडी येथे नेमणूक दिली आहे.
कणकवली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर हे वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे सकाळी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या खुनाच्या घटनेनंतर नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या हुलावले यांना त्याठिकाणी तात्पुरता कार्यभार देण्यात आला. मात्र काही तासाच्या आत त्यांना सावंतवाडीत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरी याठिकाणी कार्यरत असलेले श्री कोरे यांना कणकवली येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.