राज्यात वीज टंचाई महाविकास आघाडी सरकारामुळे -आ.नितेश राणे

राज्यात वीज टंचाई महाविकास आघाडी सरकारामुळे -आ.नितेश राणे

*कोकण Express*

*राज्यात वीज टंचाई महाविकास आघाडी सरकारामुळे -आ.नितेश राणे*

*नियोजन शून्य कारभारामुळे लोडशेडिंग*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्यात कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षाच्या राजवटीत पुन्हा वीज टंचाई सुरु झाली आहे.सत्तेत कॉग्रेस व राष्ट्रवादी म्हणजे लोडशेडिंग हे ठरलेले आहे .नियोजन शून्य कारभारामुळे हे होत आहे.लोडशेडिंगबाबत विचारणा केल्यावर केंद्रावर बोट दाखवतात,हे निर्लज्जपणा सारखे वागत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रावणाप्रमाणे १० पालकमंत्री आहेत.पालकमंत्री उदय सामंत आहेत कुठे?लोडशेडिंग नियोजन नाही.किरण सामंत अधिकाऱ्यांना फोन करताहेत.लोडशेडिंगचे संकट महाविकास आघाडी सरकार निर्मित असल्याचा घणाघाती आरोप आ.नितेश राणे यांनी केला.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोडशेडिंगबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उदाहरण पाहिल्यास फिडर प्रमाणे होत असले तरी नियोजन असते,तर वेगळी परिस्थिती असती.महाविकास आघाडीचे सरकार संकटाची पूर्व तयारी करत नाहीत.कोरोनात देखील नियोजन नसल्याने राज्यात धोका निर्माण झाला होता.राज्य सरकारचा कोणत्याही संकटात एककलमी कार्यक्रम फक्त केंद्राकडे बोट दाखवले जात आहे,ही दुर्दैवी असल्याचा टोला आ.नितेश राणे यांनी लगावला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आता कुठे पर्यटन व्यापार उठत आहे.जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या अडचणीत व्यापारी आहेत.पर्यटन मंत्री म्याव म्याव करून जिल्ह्यात येऊन गेले.लोडशेडिंगमुळे पर्यटक कसे थांबणार ?याचे उत्तर पर्यटन मंत्री,पालकमंत्री व सत्ताधारी आमदारांनी दिले पाहिजे.पर्यटनाचे पट्टे आहेत,त्यांना वीज नसेल तर काय उपयोग?सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पेशल केस का नाही?इथे विजेचे जास्त नियोजन का होत नाही.राज्यातील पर्यटन वाढवायचे असेल तर सरकारने वेगळे नियोजन करावे.राज्यातील मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.पैसे खाऊन स्वतःचे भविष्य उज्ज्वल करीत आहेत.सरकारचा चेहरा लोकांसमोर ठेवला आहे.केंद्रामुळे लोडशेडिंग होत नाही.राज्याने नियोजन केले नसल्यामुळे सरकार निर्माण हे संकट आहे.आता राज्य सरकार वीज खरेदीच्या मूडमध्ये येत आहे,तेव्हा भ्रष्टाचार होतो, हे कोरोना काळातील झालेल्या घोटाळ्यानुसारच झोल होईल.वीज खरेदीत घोटाळा झाल्यास उद्या पेंनड्रॉईव्ह निघतील,असा टोला आ.नितेश राणे यांनी लगावला.

जिल्ह्यात वीज लोडशेडिंग काळात पत्रकार कर्तव्य बजावत असताना ३५३ गुन्हे दाखल होत असतील,त्याविरुद्ध आवाज उठवणार आहोत.हा माध्यमाचा आवाज दाबण्याचा करण्याचा प्रयत्न करत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक पालकमंत्री नाही तर काही नेते पालकमंत्री समजत आहेत.१० पालकमंत्री असल्याने अधिकाऱ्यांना फोन करत आहेत.पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात पाट फिरवली आहे.कोरोना पुन्हा वाढत आहे,बूस्टर डोस किती लोकांनी घेतला आहे,जास्तीत जास्त लोकांना देण्यासाठी नियोजन केले पाहिजे.नाहीतर अधिकृत किरण सामंत यांना पालकमंत्री बनवा.अधिकाऱ्यांना फोन त्यांचेच येत आहेत,असा चिमटा शिवसेनेला आ.नितेश राणे यांनी काढला आहे.

अमोल मिटकरी पैसे दिले की पाहिजे ते बोलतात,हे अनुभव आहेत.खा.राऊतही तसेच आहेत.ब्राम्हण समाजाबद्दल मिटकरी यांची भूमिका होती की राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका होती,हे जाहीर करावे. नंतर माफी मागून उपयोग नाही.अमोल मिटकरी अधिकृत आमदार आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसची ही भूमिका आहे.त्याच्या मानधनचा चेक कोणी काढला हे पाहायला हवे.संजय राऊत या प्राण्याबद्दल किती बोलावं, यांच्यावर वेळ खराब करु नये,लोंबत्या लोकांबद्दल मी बोलत नाही.जर अपक्ष आमदार व खासदार शिवसेनेला आव्हान देत आहे,हीच तर लायकी राहिलेली आहे,असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!