*कोकण Express*
*नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने रमजान सणा निमित्त जामिया मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांना फळे व पाणी वाटप..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
रमजान किंवा अन्य कोणताही व कोणत्याही धर्माचा सण आपल्या देशात परंपरेने साजरे होत असतात, याची जाणीव समाजात व्हावी या उद्देशाने “नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (आप्पासाहेब पटवर्धन चौक, जुना भाजीपाला मार्केट कणकवली) यांच्या वतीने श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर (सामाजिक कार्यकर्ते) ,श्री अशोक करंबेळकर (जेष्ठ पत्रकार) श्री दादा कुडतरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २१/०४/२०२२ कणकवली च्या ” जामिया मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांना फळे व पाणी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला
याप्रसंगी मशीदीचे मौलाना श्री शाकिर अन्सारी यांचा प्रतिकात्मक शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवुन श्री अशोक करंबेळकर (जेष्ठ पत्रकार) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
या प्रसंगी अशोक करंबेळकर म्हणाले की-कोकणात कधीही जातपात धर्म याचे अवडंबर माजविले गेले नाही, सर्वच धर्माचा व जांतीचा आदर कोकणी माणसे करतात. आणि हे अशाच पद्धतीने पुढील पिढीने ही आचरणात आणावे व सलोखा टिकवून ठेवावा.
जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री दादा कुडतरकर म्हणाले – अकबर राजाच्या दिने- इलाही पासून सर्व धर्म समभावाची कार्य पध्दती भारतवर्षाने अंगिकारली असुन त्याचा कायमच लाभ देशाला झाला आहे.
श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर म्हणाले – वेगवेगळ्या सामाजिक बांधिलकी जपताना आम्ही हिंदू मुस्लिम भाई भाई व आपल्या घरातीलच कार्य आहे व ज्यांच्या करिता हे काम करतो तो कोणत्या पंथाचा – लिंगाचा आहे हे विचारात न घेता करित असल्याने आमच्या मार्केट मधील ७० गाळेधारकांची मजबूत सामाजिक संघटना योग्य कार्य व फार कमी वेळात संपन्न करू शकतो.
जामिया मशिदीचे अध्यक्ष श्री आसिफ नाईक म्हणाले – नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ आणि आम्ही कणकवलीकर समाजात एकोपा टिकवण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात, व आज रमजान काळात त्यांनी आमच्या मशिदी मध्ये अचानक दिलेली भेट, केलेली मदत तसेच आमचे मौलाना यांचा केलेला सत्कार यामुळे आम्ही भारावून गेलो असुन, त्यांच्या कामात आम्हीही सहभागी असतो याचा आम्हाला अभिमान वाटतो. भविष्यात त्यांनी योजलेल्या कोणत्याही कार्यक्रमात आम्हा मुस्लिम बांधवांचा भरीव सहभाग असेल.
उपस्थित सर्व व्यापारी बांधवांन सोबत पोलीस दलातील मित्र श्री चंद्रकांत माने उपस्थित होते
रोजा इफ्तार सोडण्याची वेळ असल्याने या प्रसंगी श्री हनीफ पिरखान,श्री फारुख शेख, हिन्दुस्तान टेलर्स, आदी मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या

