कुडाळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी दिनकर पाडवी यांचा नंदुरबार येथे अपघाती मृत्यु

कुडाळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी दिनकर पाडवी यांचा नंदुरबार येथे अपघाती मृत्यु

*कोकण Express*

*कुडाळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी दिनकर पाडवी यांचा नंदुरबार येथे अपघाती मृत्यु*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी ल दिनकर जेमा पाडवी (मूळ रा.नंदुरबार) आपल्या नंदुरबार येथील घरी गेले होते. बुधवारी ते व त्यांची पत्नी मोटारसायकलने बाजारात जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात होऊन ते जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

दिनकर जेमा पाडवी पोलिस काॅस्टेबल बक्कल नंबर ५६६ हे कुडाळ पोलिस ठाण्यात कार्यरत होते . ते १५ एप्रिल २०२२ पासून त १९ एप्रिल २०२२ पर्यंत सलग सुट्टीवर गेले होते ही सुट्टी त्यांनी नाशिक येथे उपनिरीक्षक पदाची परीक्षा देण्याकरीता घेतली होती. परीक्षा देऊन ते आपल्या नंदुरबार येथील घरी गेले होते. बुधवारी रात्री ते आणि त्यांची पत्नी मोटारसायकलने जात असताना वाटेत अपघात होऊन ते जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!