बैंक कर्मचारी संघटनेकडून कासार्डे शाळेला मदत

बैंक कर्मचारी संघटनेकडून कासार्डे शाळेला मदत

*कोकण Express*

*बैंक कर्मचारी संघटनेकडून कासार्डे शाळेला मदत*

*कासार्डे :संजय भोसले*

देशातील सर्वात मोठी बँक कर्मचारी संघटना ए. आय. बी. ई. ए. चा ७७ वा स्थापना दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संघटनेच्या वतीने भारत भर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोल्हापूर युनिटने सिंधुदुर्गातील पणदूर येथील निराधार वृद्ध गरजूसाठी जीवनावश्यक वस्तूंसाठी मदत केली. तसेच, कासार्डेतील नागसावंतवाडी आणि जांभूळवाडी जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी शालोपयोगी वस्तू व खेळण्याच्या साहित्यांची मदत करण्यात आली.

यानिमित्त मुंबईतील मुख्य कार्यालयात आयोजित समारंभात कॉ. ठिगळे, कॉ. भावठाणकर सहित इतर माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पुण्यामध्ये माजी सैनिकांसाठी चालविण्यात येणारया सामाजिक संस्थेला भरीव मदत करण्यात आली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोल्हापूर युनिटने सिंधुदुर्गातील पणदूर येथील निराधार या वृद्ध गरजूसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे गावातही वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त कासार्डे गावातील नागसावंतवाडी आणि जांभूळवाडी जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी शालोपयोगी वस्तू व खेळण्याच्या साहित्यांची मदत करण्यात आली. महाराष्ट्र बँक कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष कॉ. बी. एस. सावंत व बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे कॉ. रानडे यांच्या हस्ते ही मदत करण्यात आली.  याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई उपस्थित होते. यानिमित्त पाठविलेल्या आपल्या विशेष संदेशात एम. एस. बी. इ. एफ. चे अध्यक्ष कॉ. नंदकुमार चव्हाण ह्यांनी सार्वजनिक व सरकारी क्षेत्रांतील संस्था आणि आस्थापनांच्या जडणघडणीमध्ये सामान्य नागरिकांची भूमिका विशद केली.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल सावंत, सचिन वंजारे, अनिकेत देसाई आदींनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!