*कोकण Express*
*जिल्हा बँकेतील अनधिकृत नोकरभरतीचा आ. केसरकरांनी विचारला जाब ?*
सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील अनधिकृत नोकर भरतीचा विषय शिवसेना जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत चांगलाच गाजला. शासन आदेश किंवा नाबार्डची परवानगी नसतांना नोकर भरती करून युवक-युवतीच्या आयुष्यशी खेळू नका.हे प्रकार थांबले पाहिजे असा मुद्दा माजी पालकमंत्री,आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित केला.चुकीच्या पद्धतीने बँकेचा कारभार का हाकता ? नियम बाह्यकाम करू नका,असे काम पक्ष हिताचे नाही असे मुद्दे या जिल्हा कार्यकारिणीत मांडले गेल्याची चर्चा आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी जिल्हा बँकेत मते मिळविण्यासाठी तीन महिन्याची अनधिकृत नोकर भरती केली जाते असा आरोप केला होता.या आरोपाचा संदर्भ घेत आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जाब विचारावा अशा पद्धतीने हा मुद्दा उपस्थित केला.त्यावर जिल्हा बँक अध्यक्ष समर्पक उत्तर देऊ शकले नसल्याने या मुद्द्याची चर्चा जिल्हात होत आहे.दरम्यान शिवसेना नेत्यांनाच या भरती संदर्भात शंखा असल्याने नोकरीत लागलेल्या युवकांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.