कणकवलीचा उद्यापासून होणारा आठवडी बाजार बंद; नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवलीचा उद्यापासून होणारा आठवडी बाजार बंद; नगराध्यक्ष समीर नलावडे

*कोकण Express*

*कणकवलीचा उद्यापासून होणारा आठवडी बाजार बंद; नगराध्यक्ष समीर नलावडे*

 *कणकवली ः प्रतिनिधी*

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ​महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच अनुषंगाने सिंधुदुर्गातही कोरोनाचे रुग्ण पॉझिटि​व्ह येत आहेत. यामुळे कणकवली नगरपंचतीने खबरदारी म्हणून उद्यापासून होणारा आठवडी बाजार बंद करण्याचे निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना आठवडी बाजार बंद राहणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या. कारण परराज्यातून,​ ​परजिल्ह्यातून येणाऱ्या विक्रते व त्यांच्या मालामुळे शहरात कोरोनाचा फैला​व​ होऊ नये व नागरिकांनाही खरेदीसाठी गर्दी करून कोरोनाचा संसर्ग होऊ नये​,​ म्हणुन पुढील मंगळवारी होणारे चार आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले​.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!