देवघर येथील कॅन्सरच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या विजय परब यांच्या साठी अरीफ बगदादी बनले देवदूत

देवघर येथील कॅन्सरच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या विजय परब यांच्या साठी अरीफ बगदादी बनले देवदूत

*कोकण Express*

*देवघर येथील कॅन्सरच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या विजय परब यांच्या साठी अरीफ बगदादी बनले देवदूत*

*राजकारण, समाजकारणा पलीकडे अरीफ बगदादिंची माणुसकीची ही जनसेवा. अरीफ बगदादिंचे नागरीकांनी मानले आभार*

*केंद्रीयमंत्री राणे, आमदार नितेश राणेंचा भक्कम पाठिंबा*

*देवगड  ः प्रतिनिधी*

देव दगडात नाही. तो माणसात आहे. माणसांची सेवा केल्यावर देव प्रसन्न होतो. हा विचार सदैव समरणात ठेवून राजकारणाच्या पलीकडे जावून समाजसेवा करणाऱ्या भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी यांनी पुन्हा एकदा आपल्या मानवतेच्या कार्याचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. हिंदळे येथील विजय परब यांच्या नाकामध्ये कँसरची गाठ झाली होती. टाटा रुग्णालयात सारे रिपोर्ट करून पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरीही त्यांचा नंबर लागला नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून ते आरिफ बगदादी यांच्याकडे आले. त्यांची समस्या ऐकून घेऊन आमदार नितेश राणेंच्या स्वाभिमान ट्रस्ट मार्फत त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले आणि पुन्हा एका कुटुंबाला आमदार नितेश राणे, आरिफ बगदादी यांच्यामुळे जगण्याचा आधार मिळाला.

हिंदळे येथील विजय परब यांची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची. त्यात या जीवघेण्या आजारामुळे त्यांच्यासह कुटुंबासमोर मोठं संकट आ वासून उभं राहिलेलं. टाटा रुग्णालयात सर्व रिपोर्ट करून झाले. आता काहीच दिवसांत उपचारही होतील, अशी आशा होती. मात्र पंधरा दिवस उलटून गेले तरीही काही चिन्हे दिसेनात. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून ते आरिफ बगदादी यांच्याकडे गेले. आरिफ बगदादी यांनी त्यांची एकंदर स्थिती समजून घेऊन स्वाभिमान ट्रस्टच्या जावेद खान आणि फैमिना मॅडम यांच्याशी संपर्क साधून याविषयी माहिती दिली आणि परब यांना मुंबईला पाठविले. दुसरीकडे शस्त्रक्रियेसाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र परब यांना हा आर्थिक भार सोसणारा नव्हता. परंतु आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान ट्रस्टच्या माध्यमातून परब यांच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी एक लाख ऐंशी हजार रुपये खर्च झाला. हा सारा खर्च स्वाभिमान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आला. आज परब यांची स्थिती अतिशय उत्तम असून आमदार नितेश राणे आणि आरिफ बगदादी यांनी केलेल्या मदतीमुळेच माझे प्राण वाचले, याची जाणीव ठेवून हे उपकार आपण कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आरिफ बगदादी हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकार्य करत आहेत. आजपर्यंत त्यांच्यामुळे कॅन्सरग्रस्त, हृदयरोगग्रस्त, मेंदूमधील गाठी, मणक्याचे आजार अशा अनेक आजारांनी ग्रस्त असणाऱ्या पंधरा ते सोळा जणांना जीवदान मिळालं आहे. त्यांच्या या मानवतेच्या कामामुळे पंधरा ते सोळा कुटुंब वाचली आहेत. हे समाजसेवेचे कार्य केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि राणे कुटुंबियांमुळे शक्य असल्याचे आरिफ बगदादी आवर्जून सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!