*कोकण Express*
*राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी सभा १८ एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणार*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणी सभा सोमवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथे हॉटेल मॅगो २ या ठिकाणी आयोजित केली आहे. असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या सभेसाठी प्रदेश संघटक सचिव शेखर माने हे उपस्थित राहून २३ एप्रिल २०२२ च्या कोल्हापूर येथील सभेबाबत मार्गदर्शन व नियोजन करणार आहेत. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी या सभेस बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.