*कोकण Express*
*माणुस आणि उत्तम करियर घडविणारी गुरुकुल अकॅडमी सविता आश्रम संचालक संदिप परब यांचे प्रतिपादन*
*पोलीस, सैन्य भरती मोफत निवासी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*कासार्डे : संजय भोसले*
आज दिवसेंदिवस माणसातील प्रेम ,माया,आपुलकी कमी कमी होत चालली आहे. अशावेळी तरुणांमध्ये या सार्यांची रुजवणूक होण्यासाठी आणि प्रशासकीय सेवेत जाऊ पाहणार्या तरुणाईसाठी गुरुकुल करिअर अकॅडमी,ओरोस ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमातून आणि स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनातून मुलांना संस्कारक्षम बनविण्याचे मोलाचे कार्य करीत आहे.असे प्रतिपादन संविता आश्रमचे संचालक संदिप परब यांनी केले.
सिंधुदुर्गातील कामकरी,कष्टकरी,शेतकर्यांची मुले पोलीस,सैन्य अशा प्रशासकीय सेवेत यावीत यासाठी सिंधुदुर्गात गेले ७/८ वर्ष अव्याहतपणे जनजागृती करणार्या गुरुकुल करिअर अकॅडमी,ओरोसच्या वतीने दिनांक १४ व १५ एप्रिल २०२२ रोजी “पोलीस,सैन्य भरती मोफत निवासी शिबीराचे” आयोजन करण्यात आले होते.या शिबीराला सिंधुदुर्ग,रत्नागिरी येथून तब्बल १४५ मुले मुली उपस्थित होती.
या शिबीराचे उद्घाटन संदिप परब यांच्या हस्ते सरस्वती मातेला आणि शिवरांयांना अभिवादन करुन झाले.जिल्ह्यातील मुलांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणार्या गुरुकुलच्या पाॅकेट डायरीचे प्रकाशन करुन सर्व विद्यार्थ्याना ती मोफत उपलब्ध करुन देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर अॅकॅडमी संचालक प्रा.एस.जी.ढोणुकसे,अॅकॅडमीचे प्राचार्य प्रा.बी.एस.जांभेकर ,क्रीडा कोच संकेत कदम,विद्यार्थी पालक आदी उपस्थित होते.
संदिप परब बोलताना पुढे म्हणाले,जिल्ह्यातील मुले प्रशासकीय क्षेत्रात येणे ही काळाची गरज आहे.त्यासाठी गुरुकुल ही जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारी एकमेव दर्जेदार अकॅडमी आहे.मुलांच्यामध्ये सामाजिक भान आणि संस्कार देऊन माणुस घडविण्याच अॅकॅडमीचे कार्य आगळेवेगळे आणि भावी वाटचालीस आदर्श व दिशा दर्शक ठरणारे आहे.
या शिबीरामध्ये पोलीस ,सैन्यातील संधी ,अनेक चाचण्या,मैदानी -लेखी मार्गदर्शनासोबत,योगसाधना,
प्रश्नमंजुषा,मनोरंजन खेळ ,अॅकॅडमीच्या कु.चैताली पेंडूरकर हीने जिमनॅस्टीक योगाच्या प्रात्यक्षिकांनी सर्वाना थक्क केले.अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रा.ढोणुकसे यांनी गणित-बुद्धीमत्ता ,राज्यघटना या विषयांतील विविध शाॅर्ट कट शिकवत मुलांची मनातील गणिताची भीती दूर केली. यासोबतच प्रा.जांभेकर ,MPSC परीक्षा उत्तीर्ण अकॅडमी प्रा.शिरसाट ,SBI परीक्षा उत्तीर्ण अकॅडमी प्रा.मंदार खानोलकर यांनी प्रत्येक विषयाचे मार्गदर्शन करत अनेक विषय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कसे अभ्यासावे याचे मार्गदर्शन केले. तर मंदार शेजवलकर यांनी परीक्षेच्या फाॅर्म भरण्यासाठीच्या कागदपत्रांचे मार्गदर्शन केले.दुपारच्या सत्रात क्रीडा कोच संकेत कदम यांच्या मार्गदर्शनातून गुरुकुलच्या क्रीडा टिमने अतिशय कौशल्यपूर्ण आणि शिस्तबद्ध मैदानी खेळांचे मार्गदर्शन केले.
दोन दिवशीय या शिबीरामध्ये गुरुकुलच्या हाॅस्टेल टिमने सर्वाना चहा ,नाष्टा ,जेवण उपलब्ध करुन दिले.
*गुरुकुलमधिल मार्गदर्शन सर्वोत्कृष्ट*
गुरुकुलने आयोजित केलेले शिबीर १२ उत्तीर्ण होणार्या मुलांसाठी दिपस्तंभ ठरणार आहे.गुरुकुल मधुन मिळणार शिक्षण हे पुणे मुंबई येथे मिळणार्या शिक्षणा बरोबरीचे आहे.गेल्या पाचही वर्षात गुरुकुलने यशाची उज्जल परंपरा यंदाही कायम राखली आहे.असे मत पंचायत समिती सदस्या सौ.सुप्रियाताई वालावलकर यांनी समारोप कार्यक्रमात व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग मालवणकर ,डाॅ.पूर्णेदू सावंत,प्रा.एस.जी.ढोणुकसे आदी उपस्थित होते.यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.दोन दिवशीय शिबीर यशस्वी होण्यासाठी अकॅडमीच्या सगळ्या विद्यार्थी,विद्यार्थिनी,प्राध्यापकांनी दिवसरात्र अतिशय मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बी.एस.जांभेकर यांनी केले.