*कोकण Express*
*जि.प घोडगे नं.१ शाळेत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न*
*विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती*
*कासार्डे: संजय भोसले*
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा घोटगे नं-१, ता. कुडाळ येथे ग्रामपंचायत घोटगे व मुंबईस्थित मान्यवर देणगीदार ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी घोटगे केंद्राचे केंद्रप्रमुख सुहास सावंत ,गावचे सरपंच श्री अमोल तेली, तसेच उपसरपंच श्री गितेश सावंत सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. घोटगे नं.१ शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री तुकाराम घाडी घोडगे, बाजार शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष श्रीम. अमिता पांचाळ तसेच घोटगे मळी शाळा व्यवस्थापन अध्यक्षा श्रीम. संचिता सूद व सवॆ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच घोटगे नं.१ चे माजी अध्यक्ष दिपक मोयेॅ, शाळा भरणी आगार मुख्याध्यापक श्री खांडेकर व घोटगे गावातील सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक ग्रामस्थ, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रारंभ शालेय विद्यार्थ्यांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाला. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात घोटगेबाजार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. शलाका राणे यांनी विविध शालेय स्पर्धा व उपक्रम यांचे महत्व व गरज याविषयी माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य श्री लॉरेन्स मांन्येकर यांना कला सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडी यांच्यातर्फे जिल्हा स्तरीय ज्ञानदीप पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत घोटगे व शाळा घोटगे नं.१ च्या वतीने सत्कार करण्यात आला .उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी गावचे सरपंच श्री अमोल तेली यांनी हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण व मुलांच्या उस्फुर्त संख्येने सहभागी करून यशस्वी रित्या आयोजन केल्याबद्दल सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक व स्पर्धकांचे कौतुक केले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला ,वक्तृत्व स्पर्धा ,हस्ताक्षर स्पर्धा ,रंगभरण स्पर्धा, यांचे गटानुसार आयोजन करण्यात आले होते तसेच संगीत खुर्ची ,माठ फोडणे ,या सारख्या फनी गेम्सचे व रेकॉर्ड डान्स स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रत्येक गटात गटानुसार प्रथम तीन क्रमांकांना बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले . विविध स्पर्धांचे परीक्षण भरणी आगार शाळेचे मुख्याध्यापक श्री श्रीकांत खांडेकर आणि सहकारी शिक्षक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोटगे बाजार शाळेच्या उपशिक्षिका श्रीम.अंजली चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शाळा घोटगे नं 1चेउपशिक्षक श्री दत्ता थापडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घोटगेगावच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपशिक्षक व केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सावंत यांनी परिश्रम घेतले.

