*कोकण Express*
*स्विफ्टची दुचाकीला धडक : युवक जखमी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मळगाव रेडकरवाडी येथे बहिणीला लग्न पत्रिका देऊन न्हावेली येथे माघारी जात असताना स्विफ्टकारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दत्ताराम पार्सेकर (वय ३५, रा. न्हावेली ) हा युवक गंभीर जखमी झाला. झाराप-पत्रादेवी बायपास वर मळगाव जोशी -मांजरेकरवाडी सर्कलवर सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात घडला.
या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर राधानगरी नंदकुमार मगदूम हे आपल्या स्वीफ्ट डीझायरने ( एम एच ०९ इ के ९२६५) कुटुंबीयांसमवेत फोंडा कणकवली मार्गे गोव्याच्या दिशेने निघाले होते. याच वेळी मळगाव सर्कल त्यांच्या गाडीची सर्कल क्रॉस करणाऱ्या दुचाकीला (एम एच ०७ – वाय ६५७४) ला धडक बसल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर खाजगी वाहनाने दुचाकीस्वार दत्ताराम पार्सेकर याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी सावंतवाडीचे माजी सभापती राजू परब, दीपक जोशी, भाऊ गोसावी, सिद्धेश आजगावकर, विजय हरमलकर आदींसह स्थानिक उपस्थित होते. याची माहिती मिळताच पोलीस बीट अंमलदार शरद लोहकरे यांच्यासह पोलिस घटनास्थळी उपस्थित झाले असून घटनेचा पंचनामा सुरू आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जखमेवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.