पोलिस कल्याण निधी अंतर्गत कणकवली येथे सुरू करण्यात आलेला पेट्रोल पंप इंधन तुटवड्यामुळे वारंवार बंद

पोलिस कल्याण निधी अंतर्गत कणकवली येथे सुरू करण्यात आलेला पेट्रोल पंप इंधन तुटवड्यामुळे वारंवार बंद

*कोकण Express*

*पोलिस कल्याण निधी अंतर्गत कणकवली येथे सुरू करण्यात आलेला पेट्रोल पंप इंधन तुटवड्यामुळे वारंवार बंद*

*वाहन चालकांची होतेय गैरसोय*

*कासार्डे : संजय भोसले*

नियमित पेट्रोल-डिझेल पुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची मागणी

कणकवली पोलिस स्टेशन नजिक पोलिस कल्याण निधी अंतर्गत सुरू करण्यात आलेला पेट्रोल पंप इंधन तुटवड्यामुळे वारंवार बंद ठेवण्यात येत असल्याने वाहन चालकांची फारच मोठी गैरसोय होत आहे.यामध्ये कणकवली पोलिस निरीक्षक यांनी तातडीने लक्ष घालून नियमित आणि सुरळीत पेट्रोल डिझेल पुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

कणकवली-आचरा मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी आणि कणकवली पोलिस स्टेशनच्या नजिकच पोलिस कल्याण निधी अंतर्गत पेट्रोल पंप सुरू करण्यात आलेला आहे.त्यामुळे वाहन चालकांची तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांची पेट्रोल डिझेलसाठी चांगली सोय झाली होती.त्यामुळे वाहनांची सतत वर्दळ सुरू असते.मात्र अलिकडे या पेट्रोल पंपांवरती नियमित पेट्रोल डिझेल पुरवठा वेळेत होत नसल्यामुळे वारंवार पेट्रोल डिझेल पुरवठ्या अभावी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येत असल्याने वाहन चालकांची गैरसोय होई लागली आहे.

कणकवली शहरातील इतर पेट्रोल पंचांच्या तुलनेत कणकवली पोलिस स्टेशन नजिक पोलिस कल्याण निधी अंतर्गत सुरू करण्यात आलेला पेट्रोल पंपावरती लहान मोठ्या वाहनांची पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नेहमीच मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते.वारंवार इंधन पुरवठा वेळच्या वेळी होत नसल्यामुळे वारंवार पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहनचालकांची फार मोठी गैरसोय होत असल्याने याकामी आपण स्वत:हून वेळीच लक्ष घालून सदर पेट्रोल पंपावरती नियमित आणि सुरळीत पेट्रोल डिझेल उपलब्ध होईल यादृष्टीने उपाययोजना करण्यात यावी.तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी देखील या गोष्टीची तातडीने दखल घ्यावी अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरिक्षक मनोज तोरसकर यांनी कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!